मुंबईकरांना मोठा दिलासा
मुंबईमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या (Covid19) पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ओमिक्रॉन (Omicron) आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर पेडणेकरांनी बीकेसी कोविड सेंटरची (BKC Covid Center) पाहणी केली. मुंबईत सध्या चौपट वेगानं रुग्णवाढ होतेय, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. तसंच तुर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताच विचार नाही, पण आगामी काळातील परिस्थिती पाहून निर्बंध कठोर होऊ शकतात असा इशारा पेडणेकरांनी दिला आहे.महापौर किशोरी पेडणकर यांनी यावेळी आपण ग्राऊंडवर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास प्राधन्य देतो असं सांगितलं. तसंच खुर्चीत बसून बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष कमा करून दाखवा असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. पेडणेकरांनी विरोधकांच्या टीकेला जारदार प्रत्यूत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कावीळ झाल्यानंतर सर्वांना पिवळं दिसतं, असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच विरोधकांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये.