मोड आलेले मूग रोगप्रतिकारक शक्तीसाठी लाभदायक

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे हे कधी नव्हे इतके महत्त्वाचे बनले आहे. मोड आलेले मूग याचे सेवन त्यासाठी लाभदायक ठरू शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा मुगाच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत होते.

मोड आलेले मूग किंवा मटकीसारखी कडधान्ये ही आरोग्यासाठी एखाद्या खजिन्यासारखीच असतात. अशा कडधान्यांमध्ये प्रोटिन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, आयर्न, अँटिऑक्सिडंटस्, कॉपर तसेच ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ सारखी विविध जीवनसत्त्वे असतात. अशा कडधान्यांमध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी अशा अंकुरित मुगाचे सेवन केले तर त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चांगले बळ मिळते.

वजन घटवणे, पचनसंस्था मजबूत करणे यासाठीही हे उपयुक्त ठरते. मोड आलेल्या मुगात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पोटाच्या आरोग्यासाठी ते लाभदायक ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *