कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदी करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा?
देशातील कोरोना संकट वाढतच चालले असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या गुरुवारी या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी येथे दिली. अतिशय वेगाने फैलावणाऱ्या ओमायक्रॉन स्ट्रेनमुळे दैनिक रुग्णसंख्या वाढ पावणे दोन लाखांपर्यंत पोहोचलेली आहे.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन विविध राज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच युवकांच्या लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश त्यावेळी पंतप्रधानांनी दिले होते३ जानेवारीपासून युवकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती तर आरोग्य क्षेत्रातील लोक, फ्रंटलाईन कर्मचारी आणि गंभीर आजार असलेल्या ६० वर्षावरील लोकांसाठी नुकतीच बूस्टर डोसची मोहीम सरकारने सुरु केली होती.