प्रियांका गांधींची मोठी घोषणा… ‘उन्नाव’ पीडितेच्या आईला उमेदवारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने आज जाहीर केली. पक्षाने १२५ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये ४० टक्के महिलांचा समावेश आहे. यामध्ये उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईचाही समावेश आहे.
पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर प्रियांना गांधी यांनी म्हटलं आहे की, शेतकरी, तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतील, अशा महिलांना आम्ही उमेदवारी दिली आहे. आम्ही कोणत्याही नकारात्मक अभियानात सामील होणार नाही. उत्तर प्रदेश राज्याचा विकास, राज्यातील दलित, मागासवर्गीयांची प्रगती हेच आमचे उद्देश आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. यासाठी १०, १३, २०, २३ आणि २७ फेब्रुवारी, ३ व ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १० मार्चला होणार आहे.२०१७ मध्ये उन्नाव येथील १८ वर्षीय मुलीने भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर व त्यांच्या भावांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. माझ्या वडिलांना आमदार सेंगर यांनी मारहाण केल्याचेही तिने म्हटले होते. पोलिसांनी पीडितेच्या वडिलांनाच अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूला आमदार सेंगर जबाबदार असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. या आरोपानंतर सेंगर याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
पीडिता दोन मावशी व वकीलांसमाचे रायबरेली जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाता पीडितेच्या दोन्ही मावशी जागीच ठार झाल्या होत्या तर पीडित युवती व तचिे वकील गंभीर जखमी झाले होते. या अपघातामागेही सेंगर यांचा हात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. ४ मार्च २०२० रोजी सेंगर, त्याचा भाऊ व अन्य पाच आरोपींना २०२० मध्ये १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.