सेवा निवृत्तीचा कार्यक्रम रेल्वे स्टेशनवर

कोरोना संसर्गामुळे (Covid19) निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सरकारकडून वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तर अशा परिस्थितीत देखील कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मुंबईतील दादर (Mumbai) स्थानकात आज असंच चित्र पाहायला मिळालं. दादर रेल्वे स्थानकात, (Dadar Railway Station) सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या निवृत्ती समारंभ आणि वाढदिवस नियम पायदळी तुडवत, वाजत गाजत साजरा करण्यात करण्यात आला.मुंबईत दादर हे एक महत्त्वाचं स्थानक आहे. या स्थानकातून लाखो लोकांची ये-जा सूरू असते. कायम पोलिसांचा बंदोबस्तही असतो. रेल्वेस्थानकात वावरण्यासाठी काही नियम असताना देखील आज चक्क हे नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. रेल्वेतील एक महिला शीला चौहान यांच्या वाढदिवस आणि निवृत्ती समारंभानिमित्ताने आज दादर स्थानकात ढोल ताशा वाजवत, कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक नाचताना दिसले. ढोल-ताशे वाजवत यावेळी अनेकजण याठिकाणी सहभागी झालेले दिसले.रेल्वे विभागात 34 वर्ष सेवा दिल्यानंतर शिला ह्या सेवा निवृत्त होताना झाल्याचा समारंभ थेट रेल्वे स्थानकात साजरा करण्यात आला. यामध्ये शीला यांना रेल्वेच्या ऑटोमॅटिक मशीन गाडीमध्ये बसवून स्थानकातुन फिरवण्यात आलं. कोरोना काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे नियम करण्यात आलेले आहेत. त्या सर्व नियमांची पायमल्ली या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. त्यामुळे दादर स्थानकात झालेल्या या कार्यक्रमावर रेल्वे प्रशासन कारवाई करणार का हे पाहवे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *