कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा व्हिडिओ व्हायरल
कोल्हापुरातील पंचगंगा नदीतील (river) पाणी प्रदुषणामुळे दुषित झाले आहे. प्रदुषणामुळे नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे ऑक्सिजन मिळवण्यासाठी नदीतील हजारो मासे पाण्यावर तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. विशिष्ट गुणधर्मांचे प्रदूषित पदार्थ मिसळल्यामुळे पाण्याचे गुणधर्म बदलत आहेत. यामुळे पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता कमी होऊन ते वापरास अयोग्य बनत चालले आहे.
कसबा बावडा येथील महादेव पिसाळ या तरुणाने पंचगंगा नदीमध्ये (river) ऑक्सिजन अभावी लाखो मासे तरंगत असल्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, अखेर हा व्हिडिओ कसबा बावडा येथील पिसाळ यांनीच बनवून व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले.