विराट काेहलीची रवी शास्त्रींनी केली पाठराखण, म्हणाले…
माजी क्रिकेटपटू व भारतीय क्रिकेट संघांचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Shastri and kohli ) यांची जोडी बहुचर्चित. या दोघांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विदेशात केलेली कामगिरी अविस्मरणीच. तसेच दोघेही नेहमी एकमेकांवर स्तुतीसुमने नेहमीच चर्चेत राहिलेली. आता विराट कोहली बाजू शास्त्री यांनी अप्रत्यक्षपणे मांडली आहे.शास्त्री यांनी म्हटले की, सचिन तेंडूलकर याने आपल्या कारकीर्दीत एुकण सहा विश्वचषक स्पर्धा खेळला. मात्र यातील एकच विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळाला. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघात सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांच्या सारखे प्रमुख आणि प्रतीभावंत खेळाडू होते. तेही कधीच विश्वचषक स्पर्धेतील विजेता संघात नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की, या खेळाडूंची कामगिरी चांगली नव्हती. भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारे केवळ दोनच कर्णधार आपल्याकडे आहेत, असेही शास्त्री यांनी या वेळी स्पष्ट केले.भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिलेल्या कोणत्याही खेळाडूंबाबत मला आक्षेपार्ह विधान करायचे नाही, असेही शास्त्री यांनी ‘एएनआय’ यावृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली नाही, अशी टीका मागील काही वर्ष होत आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली याला टी २० आणि वन डे संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार व्हावे लागले. विराट कोहली आणि गांगुली यांच्यामधील वादही चव्हाट्यावर आला हाेता. यापोठापाठ दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. यानंतर आता शास्त्री यांनी भारतातील माजी दिग्गज क्रिकेटपटूंनाही तुम्ही विश्चचषक जिंकलेला नाही, असे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट करत विराट कोहलीचे समर्थन केले आहे, असे मानले जात आहे.