15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
राज्यातील महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडतच आहे. यावल तालुक्यातही अशीच अत्याचाराची घटना उघड झाली आहे. तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी शेतात नेत अत्याचार केला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडीता शौचासाठी बाहेर पडल्यानंतर अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 26 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी एका गावातील संशयीत आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांनी अल्पवयीन मुलीला शेजारच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला. घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री 8 वाजता धाव घेवून दोन्ही संशयीत आरोपींविरोधात तक्रार दिल्याने आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांच्या विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.