एअर इंडियासाठी टाटा ग्रुपला आनंद महिंद्रांनी दिल्या भन्नाट शुभेच्छा

काल टाटा ग्रुपकडे एअर इंडिया सोपवली. केंद्र सरकारने टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतली होती. आता एअर इंडियाच्‍या ‘महाराजा’ पुन्‍हा एकदा टाटा समुहाकडेच सोपवण्‍याची औपचारिकता काल पूर्ण झाली. यावर आता टाटा ग्रुपवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन टाटा ग्रुपला शुभेच्छा दिल्या आहेत.
आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट व्हायरल झालं आहे. ”एअर इंडिया हा असा ब्रँड होता जो देशाची मौल्यवान संपत्ती होता. एअर इंडियाला जुनी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी माझ्या दृष्टीने Tata पेक्षा चांगला पालक असूच शकत नाही, टाटा आणि एअर इंडियाचे अभिनंदन” अशा शुभेच्छा आनंद महिंद्रा यांनी ट्विट मध्ये दिल्या आहेत.
८ ऑक्टोबर २०२१ राेजी झालेल्‍या लिलावावेळी एअर इंडिया ( Air India ) ही १८ हजार करोड रुपयांमध्ये टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली होती. टॅलेस ही कंपनी टाटा समुहाचीच उपकंपनी आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हस्‍तांतरीत करण्‍यात आल्‍याचे सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. एअर इंडियाचा ताबा ‘टॅलेस’कडे देण्‍याचा करार आता पूर्ण झाला आहे. नवीन कंपनीला आमच्‍या शुभेच्‍छा, मला विश्‍वास आहे की, टाटा समूह पुन्‍हा एकदा एअर इंडियांच्‍या पंखांना बळ देईल. देशातील विमान सेवेसाठीही ही नवी सुरुवात ठरेल, असा विश्‍वास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांनी व्‍यक्‍त केला. (TATA Group)
आम्‍ही एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपविण्‍याची सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे सरकारने स्‍पष्‍ट केले. यानंतर देशातील सर्वात मोठी बॅक स्‍टेट बँकेने एअर इंडियासाठी कर्ज देण्‍यास तयार असल्‍याचे म्‍हटले आहे. सरकारी कंपनी एअर इंडिया आजपासून पुन्‍हा एकदा खासगी कपंनी झाली आहे. एअर इंडियाकडे आंतरराष्‍ट्रीय मार्गांवर देशातंर्गत विमान सेवेसाठी पर्याय आहेत. आता टाटा समूहाने याची जबाबदारी घेतल्‍याने प्रवाशांना आणखी चांगली सुविधा मिळेल, असे मानले जात आहे.(TATA Group)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *