प्रा. संतोष चौगुले यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद आर्टस् ॲण्ड सायन्स कॉलेज सांगलीचे सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरख चौगुले यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विषयामध्ये “निवडक आशियाई अमेरिकन कादंबरीकार यांच्या साहित्यातील संस्कृतीच्या विविध पैलूंचा अभ्यास” यावरती प्रबंध सादर केला होता. तो प्रबंध विद्यापीठाने स्वीकारून त्यांना पी. एचडी. पदवी प्रदान केली.
सदर पी. एचडी. प्रबंध डॉ. राजश्री बारवेकर, इंग्रजी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला होता. त्यांच्या या यशाबद्दल लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मॅनेजिंग कौन्सिल शांतीनाथ कांते, मानद सचिव सुहास पाटील तसेच श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. लाडगावकर, उपप्राचार्य डॉ. पी. एन. गोरे (कला विभाग), उपप्राचार्य डॉ. पी. एन. चौगुले ( पी.जी. विभाग), इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. हार्डीकर मॅडम, इतर सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सदर यश मिळवण्यासाठी त्यांना त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच प्रताप धनवडे, ज्ञानेश्वर सुतार व इतर सर्व मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.