PM आवास योजनेसाठी तब्बल इतक्या कोटींची तरतूद?
PM आवास योजनेसाठी (Union Budget) यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल ४८ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. PM आवास योजनेंर्गत २०२२-२३ दरम्यान अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम अंतर्गत ८० लाख कुटुंबाची ओळख पटवली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री आवास योजना PMAY केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मिशनपैकी ही महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत सर्वांना स्वत:चे घर देण्याची सरकारचे लक्ष्य आहे. सरकारच्या या उद्देशासाठी CII (इंडस्ट्री बॉडी सीआयआय) ने सरकारकडे आवास योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी विमा देण्याचीदेखील मागणी केली होती.
आतापर्यंत या योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विमा कवच मिळाले नव्हते. CII (इंडस्ट्री बॉडी सीआयआय) चं म्हणणं आहे की, जर पीएम आवास योजनेसाठी लोनसोबत इन्श्योरेन्सचा लाभ मिळाला तर कठीण परिस्थितींमध्ये घराचा खर्चदेखील चालेल आणि घर बनण्याचं कामदेखील नाही थांबणार.