व्यायाम- खाण्यादरम्यान नेमकं किती अंतर असावं?

काही जण सकाळी व्यायामासाठी जीमला जाणे पसंत करतात. तर काही जण संध्याकाळला महत्व देतात. तुमची रोजची लाईफस्टाईल (Lifestyle) कशी आहे त्यावरून तुम्ही कधी व्यायाम (Exersice) करायचा ते ठरवता. लोकांना अनेकदा व्यायामासंदर्भात प्रश्न पडलेले असतात. व्यायामाआधी खावं (Food) कि रिकाम्या पोटी व्यायाम करावा असा मुख्य प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञने वर्क आऊट प्लॅन कसा असावा हे सांगितले आहे. वर्कआऊट करण्याआधी काय करावे हे यामुळे समजते. याचे पालन केल्याने तुम्हाला व्यायामासाठी अधिक मदत मिळू शकते. तसे स्नायू टोन करणे, चरबी कमी होणे, हाडांची घनता वाढवणे असे अनेक शारीरिक फायदेही मिळतात.
वर्कआउट करण्यापूर्वी तुमच्या शरीराला (Body) चांगले पोषण आणि प्लॅन केलेले जेवण मिळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्ही तुम्ही योग्य आहार घेता तेव्हा तुमचे स्नायू कॅलरी बर्न करतात. याचा अर्थ व्यायामादरम्यान अधिक कॅलरीज बर्न करणे गरजेचे असते.

व्यायामापूर्वी काही खाल्ल्याने दुखापत टाळण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही वर्कआउट करणे सुरू करता, तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम हवे असतात. अशावेळी अनेकदा स्नायू ताणून किंवा शरीराचा कोणताही भाग ताणून दुखापत होण्याची शक्यता असते. शिवाय थकवा आल्याने दिवसभर काम करणे कठीण होते. पण जेव्हा तुम्ही नीट आणि पुरेसे खाता तेव्हा तुम्हाला आतून एनर्जी मिळते. तुम्ही दुखापत होण्यापासून वाचता. आणि व्यायाम उत्साहाने करता.
व्यायामापूर्वी चहा-कॉफी पिऊ नये. कारण या दोन्ही पेयात कॅफिन असते. कॅफिन मेंदू आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करते. तसेच यामुळे डिहायड्रेशन होते. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी ही पेये पिण्यामुळे नुकसान होऊ शकते.
व्यायाम करण्याच्या १०-१५ मिनिट आधी फळ, सुका मेवा खाऊ शकता. जे लोकं सकाळी व्यायाम करतात त्यांच्यासाठी हे खाल्ल्याने फायदा होतो. खाण्यात अंतर ठेवण्यापेक्षा तुम्ही अशाप्रकारे भूक भागवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *