कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

रक्ताच्या कर्करोगावरील (blood cancer) उपचारासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधन गटाला ऑस्ट्रेलियन पेटंट मिळाले आहे. आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून ‘सिंथेसिस ऑफ ब्लड कॅन्सर सेल ग्रोथ इनहीबीटर’ या विषयावरील औषधनिर्मितीसाठी हे पेटंट मंजूर करण्?यात आले आहे. कोल्हापूरच्या संशोधन क्षेत्रात मानाचा तुरा खोवणार्‍या या औषधाला अमेरिकन पेटंट मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी. के. गायकवाड आणि संशोधक विद्यार्थी डॉ. चिराग नारायणकर, डॉ. निवास देसाई, डॉ. मानसी पाटील (स. गा. म. कॉलेज, कराड), डॉ. सागर देशमुख (न्यू कॉलेज, कोल्हापूर), डॉ. प्रतिष्ठा पवार (दा. पा. कॉलेज, कर्जत) व डॉ. उमेश पवार (पं. खे. कॉलेज, सावंतवाडी) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले. रक्ताच्या कर्करोगावर निवडुंगाच्या अर्काचा पर्याय देण्याचा प्रयत्नया औषधामध्ये निवडुंग वनस्पतीचा अर्क वापरला आहे. यातील जीवाणूरोधक गुणधर्म रक्ताच्या कर्करोगाच्या पेशींची मात्रा कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारावर चांगला पर्याय देण्याचा हा प्रयत्न असल्याचे डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.

डॉ. प्रतिष्ठा पवार (दा. पा. कॉलेज, कर्जत) व डॉ. उमेश पवार (पं. खे. कॉलेज, सावंतवाडी) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.

रक्ताच्या कर्करोगावर निवडुंगाच्या अर्काचा पर्याय देण्याचा प्रयत्न

या औषधामध्ये निवडुंग वनस्पतीचा अर्क वापरला आहे. यातील जीवाणूरोधक गुणधर्म रक्ताच्या कर्करोगाच्या (blood cancer) पेशींची मात्रा कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारावर चांगला पर्याय देण्याचा हा प्रयत्न असल्याचे डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

रक्ताचा कर्करोग हा जीवघेणा आजार आहे. जगात लाखो नागरिकांचा यामुळे मृत्यू होतो. यावर औषध तयार करण्यासाठी जगभरातील संशोधक अहोरात्र झटत आहेत. मात्र, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाला रक्ताच्या कर्करोगावरील आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियन पेटंट मिळाले आहे. यापूर्वीही या विभागाला स्तनाच्या कर्करोगावरील उपचारासाठी भारत सरकारने दोन पेटंट मंजूर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *