आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणार्‍या औषधांचा तुटवडा

तपासणीसह इंजेक्शन आणि औषध केवळ पाच रुपयांत देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील नागरिकांचा फार मोठा आधार आहे. परंतु; औषधांची (medicine) मागणी आणि पुरवठा यांच्यात खूप मोठी तफावत आहे. प्राथमिक उपचारासाठी जी औषधे लागतात तीसुद्धा शंभर टक्के कधीच उपलब्ध होत नाहीत. मागणीच्या केवळ 30 टक्के औषध पुरवठा होत असल्याने ग्रामीण भागात देखील आता मेडिकलची संख्या वाढू लागली आहे.

ग्रामीण भागात वर्षाला सरासरी आठ ते दहा हजार श्‍वान चावण्याच्या घटना घडत असतात. त्यांच्यासाठी 3 ते 4 हजार व्हाईल लागतात. परंतु शासनाकडून केवळ हजारच व्हाईल येत असतात. सर्पदंशावरील औषधाचीदेखील अशीच परिस्थिती आहे. वर्षाला चार ते पाच हजार सर्पदंशांच्या घटना घडत असतात.

त्यासाठीदेखील 3 ते 4 हजार व्हाईल लागत असतात. परंतु उपलब्ध मात्र केवळ 1 हजारच होतात. त्यामुळे आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद स्वनिधी यावरच अवलंबून राहावे लागते. त्यांनी लवकर निधी उपलब्ध करून दिला नाही तर या औषधाची टंचाई निर्माण होते.

शासनाकडून 1700 प्रकारची औषधे (medicine) खरेदी केली जातात. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यात 60 ते 70 प्रकारची औषधे उपलब्ध असतात. परंतु; आरोग्य केंद्रांमध्ये लागणार्‍या औषधांची संख्या मात्र केवळ पाच आहे. मधुमेह,, रक्‍तदाब यावरील औषधेदेखील आता आरोग्य केंद्रांमधून दिली जातात.

आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणार्‍या पाच औषधांमध्ये अ‍ॅम्लोडेफीन, मेटफॉर्मिंग, पॅरासिटीमॉल या गोळ्या तसेच खोकल्याचे औषध उपलब्ध असणे आवश्यक असते. परंतु; ते देखील पुरेसे उपलब्ध नसते. साधारणपणे 45 ते 50 लाख गोळ्या जिल्ह्याला प्राप्‍त होणे अपेक्षित आहे. परंतु; शासनाकडून केवळ 10 ते 15 लाखच गोळ्या उपलब्ध होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *