कोल्हापुर : एका संशयानं केलं आयुष्य उद्ध्वस्त

(crime news) कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एका तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणातून पोलिसांनी मृत तरुणीच्या एका मित्राविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी अद्याप संशयित आरोपीला अटक केली नसून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

संकेत पंडित शिखरे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील रहिवासी असणारी मृत तरुणी हातकणंगले तालुक्याच्या एका गावातील खाजगी रुग्णालयात नोकरीला होती. ती वारंवार फोनवर बोलत असल्यानं तिचा संशयित आरोपी संकेतसोबत वाद झाला होता. याच वादातून आरोपी संकेत यानं मृत तरुणीवर चारित्र्याचा संशय घेतला होता.

दोघांमधील वाद टोकाला गेल्यानंतर आरोपीनं मृत तरुणीकडील मोबाइल हिसकावून घेत, तिला मारहाण केली. यानंतर रागाच्या भरात पीडित तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. संबंधित घटना 20 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत घटनेच्या तपासाला सुरुवात केली होती. पण आत्महत्येचं नेमकं कारण समोर येत नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी बारकाईनं तपास केल्यानंतर पोलिसांना आरोपी मित्र संकेत यांच्यावर संशय आला. (crime news)

त्यानंतर आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संकेत शिखरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास शाहुपुरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *