कोल्हापुरात जिल्ह्यातील महिलांची परवड थांबणार

Hospital building, medical icon. Healthcare, hospital and medical diagnostics. Urgency and emergency services. Vector illustration in flat style

कोल्हापूर ः अर्थसंकल्पात कोल्हापूरसह राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 100 बेडस्च्या स्वतंत्र महिला रुग्णालयांच्या (hospital) उभारणीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचारासाठी होणारी महिलांची परवड थांबणार आहे. जिल्ह्यात स्वतंत्र महिला रुग्णालय नाही. त्यामुळे सीपीआरसह महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयावर महिला रुग्णांचा मोठा ताण आहे.

अत्याधुनिक 100 बेडस्च्या रुग्णालयामुळे महिलांना एकाच छताखाली उपचार घेणे सोयीचे होणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. 2013 मध्ये या 100 बेडस्च्या महिला रुग्णालयास (hospital) मंजुरी मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *