अंबाबाई मंदिर परिसर विकासकामांना मिळणार चालना

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिर परिसरातील विकासकामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने अर्थसंकल्पात (budget) जाहीर केला आहे. यामुळे मंदिरातील विकासकामांना चालना मिळणार आहे.

राज्य सरकारच्या शिखर समितीने 2018 मध्ये तीर्थक्षेत्र आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिरासाठी 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली होती. महापालिकेने स्वनिधीतून 7 कोटी रुपये देण्याची तयारी सरकारकडे दर्शविली होती. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात दर्शन मंडपाची इमारत, भक्त निवास व पार्किंग इमारत, सार्वजनिक स्वच्छतागृह, सरस्वती टॉकिज व बिंदू चौकनजीक बहुमजली पार्किंग बांधणे, बस स्टॉप या मुख्य कामांबरोबरच पादचारी मार्ग तयार करणे, दिशादर्शक फलक बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, अग्निशमन व सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, अशी कामे नियोजित आहेत.

यापूर्वी उपलब्ध झालेल्या 8 कोटी रुपयांच्या निधीतून सरस्वती टॉकिजजवळ बहुजमली पार्किंगचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात (budget) जाहीर झालेला 25 कोटींचा निधी आराखड्यातील कोणत्या कामांसाठी देण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *