‘किरीट सोमय्या मुलासह फरार, लूक आऊट नोटीस जारी करा
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. INS विक्रांतच्या (INS Vikrant Scam) नावावर जो घोटाळा झाला आहे. हा छोटा घोटाळा नसून त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. किरीट सोमय्या त्यांचा मुलगा निल सोमय्या आणि त्यांच्या माफिया टोळीने संपूर्ण महाराष्ट्रबरोबरच देश-विदेशातून पैसा गोळा केला. ही माफिया गँग बिल्डरांकडूनही पैसे गोळा करते, असा आरोप केला आहे.
विक्रांत बचावच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे. त्याचा तपास होईल. हे दोन ठग कुठे गायब आहेत, यावर भाजपकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यांना कुठे लपवण्यात आलं आहे. ते दोघंही महाराष्ट्राच्या बाहेर आहेत असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
त्यांचा जामीन होत नाही तोपर्यंत त्यांना लपवलं जाईल, ते विदेशातही जाऊ शकतील, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी केली जावी, मेहूल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांचा जुना संबंध आहे. त्यामुळे मेहूल चोक्सी जिथे आहे तिथे तर सोमय्या लपले नाहीत नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एक माफिया गँग बोगस पुरावे गोळा करण्याचं काम करत आहे. राजभवनाने चुकीचं काही चुकीचं काम केलं तर त्यांची उरली सुरली इज्जतही संपेल, असा इशारा संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिला आहे.
आरोपी कुठेही असतील तिथून मुंबई पोलीस पकडून आणतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.