“मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही”

(political news) शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच राजकीय सामना रंगला आहे. किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर टाच आणली. त्यानंतर, संजय राऊत यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या हे महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचे सांगत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं मोठं षड्यंत्र असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपाला आता मनसेनं प्रत्युत्तर दिलंय.

”मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत”, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्त दिलंय.

राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही, असे म्हणत राऊतांच्या आरोपावर पलटवार केला आहे. ”विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब “इ. डी” द्यायचाय त्याची चिंता करावी, राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोण्याच्या बापात नाही”, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. (political news)

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव – राऊत

”मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांनी सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत”, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. भाजपाच्या पाच लोकांनी सादरीकरण तयार केलं असून या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे आहे. काही करुन त्यांना मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे. मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,” असे गंभीर आरोप राऊत यांनी सोमय्यांवर आणि केंद्र सरकारवर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *