कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक भाजप- महाविकास आघाडी कार्यकर्ते आले आमने-सामने

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, शिवाजी पेठेतील ८ नंबर शाळेजवळ भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दुपारी गोंधळ झाला. भाजपच्या वतीने जय श्रीराम तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे या ठिकाणी वातावरण तंग बनले.
मालोजीराजे यांनी कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर वातावरण निवळले. या घटनेनंतर येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *