कोल्हापूर : तीन तासात “उत्तर’चा निकाल

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीची मतमोजणी शनिवारी (ता. 16) सकाळी 8 पासून राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे सुरु होईल. टपाली मतदान 1 व ईव्हीएम मशिनचे मतदान 14 असे एकूण 15 टेबलवर आणि 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. यासाठी राखीवसह तब्बल सव्वासे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहतील. त्यामुळे तीन तासात मतमोजणीचा निकाल जाहीर होईल असा अंदाज आहे. आमदार चंद्रकात जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे जाहीर झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्यातील ही लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याच नव्हे तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे इतिहासात कधी नव्हे ते कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत मतदानाचा टक्का वाढला आहे.उत्तरमधून आमदार कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. प्रशासकीय यंत्रणेनेही मतमोजणीचे जय्यत तयारी केली आहे. 15 टेबलवर आणि 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. या प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहाय्यक व सुक्ष्म निरिक्षक तसेच मतदान प्रतिनिधी कार्यरत राहतील. पहिल्यांदा 603 मतदारांनी केलेल्या टपाली मतांची मोजणी होईल. त्यानंतर व्हीव्हीपॅटवरील पहिल्या पाच चिठ्यांचे मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशिनद्वारे घेतलेल्या मतांची मोजणी होईल. त्यामुळे निकाला तीन तासात जाहीर होईल असा अंदाज आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीन हाताळणी करताना हत्यार बंद पोलीसांची तैनात असणार आहे.

* मतांचे स्कॅनिंग :

कोल्हापूर उत्तर मतदार संघात सैनिकांचे 95 मतदान आहे. यापैकी काही मतदारांचे ऑनलाईन मतदान झाले आहे. त्यासाठी स्कॅनिंग पध्दत अवलंबली जाते. त्यानूंसार मतदान झाल्यानंतर क्‍यूआरकोडद्वारे याचे स्कॅनिंग होईल व हे मतदान कोणाला झाल्याचे समजले. स्कॅनिंग हे पूर्णत: सर्व्हरवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्व्हर सुस्थिती असल्यास हे मत मोजण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत 5 मतदान आले आहे. 16 तारखेपर्यंत सकाळी येणाऱ्या मतांची मोजणी केली जाईल.

* कसबा बावड्यापासून मतमोजणी

ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीला कसबा बावडा परिसरारील मतदान केंद्रापासून होणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच मतमोजणीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *