“राजू शेट्टी बाहेर पडण्याचं कारण नव्हतं”

राजू शेट्टी (political leader) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यांना बाहेर पडण्याचे कोणते कारण वाटतेय माहित नाही. त्यांनी एखादी गोष्ट मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सांगितली व त्यांच्या कामांना नकार दिला असंही काही झालेलं आठवत नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीतच रहावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

“देशात व राज्यात भाजपा या देशातील शेतकऱ्यांना चिरडत आहे. शेतकरी ट्रॅक्टर वापरतो त्याचेही दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर वाढले आहेत. या सगळ्या गोष्टी शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहून याचा प्रतिवाद करायला हवा. यासाठी सर्व पक्षांची ताकद घेऊन देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी लक्ष घालावे हे अभिप्रेत आहे,” असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.

“राजू शेट्टी (political leader) महाविकास आघाडीतून का बाहेर गेले माहित नाही. आमचं सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात जेवढी मदत केली आहे ती यापूर्वी कधीच झाली नाही. आमच्या सरकारने आल्या आल्या दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. करोना काळातदेखील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं आम्ही विसरलो नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ५० हजार रुपयांपर्यंत नियमित कर्ज भरले आहे त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी यावर्षी होणार आहे,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *