10 वर्षांपासून पाहिलेलं तापसी पन्नूचं स्वप्न पूर्ण
(entertenment news) तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिने प्रत्येक सिनेमात तिची स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून तिने तिचं अभिनयाचं कौशल्य दाखवून दिलं आहे.
वरुण धवनपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत तिने काम केलं मात्र एका अभिनेत्यासोबत काम करायला मिळावं यासाठी ती गेली 10 वर्षांपासून वाट पाहात होती. अखेर तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या तापसी भलतीच खूश आहे.
‘अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है’ असं म्हणत तिने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की, तापसीचा पुढचा सिनेमा कोणत्या अभिनेत्यासोबत असणार आहे.
हो, अगदी बरोबर. अभिनेता शाहरूख खानसोबत तापसी आगामी ‘डंकी’ या सिनेमात झळकणार आहे. बुधवारी खुद्द शाहरूख खानने मजेशीर अंदाजात या सिनेमाची घोषणा केली. (entertenment news)
राजकुमार हिरानी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे शाहरूखसारखा अभिनेता आणि हिरानींसारख्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळाल्याने तापसीला लॉटरीच लागली असं म्हणायला हरकत नाही.