“…तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता”
(political news) “नागपूरच्या मातीत एक वेगळेपण आहे, संजय राऊत (Svanjay Raut) नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, असा टोला लगावणाऱ्या फडणवीसांवर (Devendra Fadanvis) राऊत राऊत यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
‘तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन्…
‘
नागपूरमधील जाहीर सभेमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, “दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं. जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे, हिंदुत्ववादी पक्ष आहे, मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे, ही सुबुद्धी आली असती. कदाचित तुम्ही आज मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन् आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय,” असा खरमरीत टोला राऊतांना फडणवीसांनी लगावला. (political news)
‘त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण’
या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, “त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झालंय आहे, असं वाटतं, पण थोडी सुबुद्धी जर महाराष्ट्रात त्यांच्या लोकांना वाटली तर महाराष्ट्र शांत राहील. आम्ही या गोष्टी त्यांना सांगू,” अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली. तसेच, नागपूरकरांचे आमच्यावरचे प्रेम वाढत चाललंय, असंही राऊत म्हणाले.