घरोघरी पुन्हा मातीची भांडी!

जुन्या काळात मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याची पद्धत होती. कोणताही पदार्थ मातीच्या भांड्यात बनवला जायचा, त्यामुळे त्या पदार्थाची चवही वेगळीच असायची; परंतु कालांतराने स्टील, लोखंड, अल्युमिनियमसारख्या धातूंनी बनविलेल्या भांड्यांनी मातीच्या भांड्यांची जागा घेतली आणि मातीची भांडी स्वयंपाक घरातून गायब झाली; परंतु आता पुन्हा मातीच्या भांड्यात (clay pot) स्वयंपाक करण्याचा मोठा ट्रेंड आला आहे.

आधुनिक किचनमध्ये मातीच्?या भांड्यांचा थाट वाढतो आहे. वाटी, पातेले आदींपासून ते तवा, माठ यांच्या किमती शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत आहेत. आता पुन्हा एकदा घराघरांत मातीची भांडी दिसू लागली आहेत. मातीचा तवा, हंडी, कडई, कुकर अशा वस्तू विविध आकारांत आणि लाल आणि काळ्या रंगांत बाजारात उपलब्ध आहेत. मोठमोठ्या प्रदर्शनांमध्येही ती हमखास पाहण्यास मिळतात. 100 रुपयांपासून दीड हजारांपर्यंत ही मातीची भांडी खरेदी करता येतात. मातीच्या भांड्यांच्या खरेदीत गेल्या तीन वर्षांत सुमारे 30 टक्?क्?यांनी वाढ झाली आहे. तसेच या भांड्यांचा योग्य प्रकारे वापर केल्?यास ती 7 ते 8 वर्षे टिकतात. जुनी जाणती मंडळी आजही मातीच्?या भांड्यात जेवण बनवणं पसंत करतात.

मातीच्या तव्यावरील जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट होते. मातीचे तत्त्व पोळ्यांमध्ये शोषले जाते, यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नामुळे गॅससारखी समस्या होत नाही. याशिवाय मातीच्?या भांड्यात जेवण शिजवताना तेलाचा वापर कमी होतो. परिणामी आम्?लपित्ताचा विकारही टळतो. कॅल्शियम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ड आणि अशी अनेक पोषक तत्त्वे मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मिळतात, असे वैद्यकीय तज्?ज्ञांनी सांगितले.

दुबई, कतार, अमेरिकेतूनही ऑर्डर

मातीच्या भांड्यांना (clay pot) आता दुबई, कतार , अमेरिकेतूनही मागणी वाढली आहे. हौसेपोटी अनेकजण ऑनलाईनही मातीची भांडी विकत घेत आहेत. मात्र, आता महामार्गावरही मातीची भांडी मिळू लागली आहे. सध्या मातीच्?या भांड्याला मागणी वाढत असल्?याने ती भाव खात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *