जिल्ह्यातील ‘ही’ पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
रस्ते अपघातातील 24 वर्षीय तरुणावर शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचे 25 एप्रिल रोजी मेंदूचे कार्य थांबले. त्यामुळे संबंधित रुग्णास ब्रेनडेड घोषित केले. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेच्या आधारे त्या तरुणाच्या परिवाराने तरुणाचे डोळे, दोन्ही किडनी, हृदय व यकृत अवयवदान केले. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ‘अॅस्टर आधार’ येथे झाली. त्यामुळे 38 वर्षीय भाजीविक्रेत्याने आजारावर मात केली आहे. ही जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया (Surgery)आहे. उर्वरीत अवयव अन्य जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवदान देणारे ठरले आहेत, अशी माहिती ‘अॅस्टर आधार’ने पत्रकार बैठकीत दिली.
‘अॅस्टरचे आधार’चे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले म्हणाले, जिल्ह्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण अॅस्टर आधारमध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच मार्गदशक व नवी दिशा देणारे ठरले. हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. भरत शहा यांनी भविष्यात अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये लिव्हिंग डोनर व लहान मुलांचे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. डॉ. बिपीन विभुते म्हणाले, आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Surgery) केल्या आहेत. कोल्हापुरात अॅस्टर आधारमध्ये ही शस्त्रक्रिया केली. पत्रकार बैठकीला अमोल कोडोलीकर, डॉ. अजय केणी, डॉ. अनिल भोसले, डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. मनीष पाठक यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.