शिरटी येथील ग्रामपंचायतीच्या सभेत जोरदार खडाजंगी
शिरटी येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत (general assembly) सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये दलित वस्तीतील कामांवरून जोरदार खडाजंगी झाली. सदस्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी सुरू झाली. सभागृहात मिटिंग सुरू असताना सदस्यांचा मोठ-मोठ्याने येणारा आवाज ऐकून दोन्ही गटाचे समर्थक आले आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन वादावादी सुरू झाली. मात्र, पोलीस घटनास्थळी हजर झाल्याने वाद आटोक्यात आला.
आज सोमवारी (दि.२५) रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मासिक (general assembly) सभा सुरू होती. सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी आम्ही सुचवलेली दलित वस्तीतील कामे केली जात नसून त्या प्रभागातील सदस्याला विश्वासात न घेता इतर कामे नियमबाह्य होत झाली असल्याचा आरोप केला. यावरून सत्ताधारी विरोधकांत जोरदार जुंपली