कोल्हापूर जिल्हयात पोलिस पथकावर काठी, दगड व चाकूचा हल्‍ला

कोल्हापूर जिल्हयात माणगांववाडी ( ता. हातकणंगले ) येथील गावठी हातभट्टी दारुअड्डयावर छापा (raid) टाकण्यास गेलेल्या स्थानीक गुन्हे अन्वेषण पथकावर अवैधरित्या दारू उत्पादन करणाऱ्या १०ते १५ अनोखी इसमांनी हल्लाबोल केला. यामध्ये काठी, दगड व चाकूचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.२६) रोजी घडली. यामध्ये एका महीला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी महीला अधिकाऱ्याचे नांव अंकीता पाटील असे असून याबाबतची फिर्याद राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम अधिकारी शितल चंद्रकांत शिंदे यांनी हातकणंगले पोलीसांत दिली आहे.

दरम्यान गुरुवारी दुसऱ्या दिवशी स्थानीक गुन्हे अन्वेषणचे पथक व हातकणंगले स्थानिक पोलीसांनी माणगांववाडीमध्ये ठिय्या मांडून अनेक दारू अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढण्यासाठी लागणारे रसायन, बॅरल व गूळ आदी मुद्देमाल जागीच नष्‍ट करण्यात आला. चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात (raid) सुमारे दोन लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्‍ट करण्यात आला. यामध्ये लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे यामध्ये केलेल्या रसायन साठयाचा समावेश आहे. या कारवाईत संशयित इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *