टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणाविरुद्ध लढणार
टी-२० वर्ल्डकप २०२२च्या सुपर १२ मधील लढती आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. सेमीफायनलचे चित्र कसे असेल हे स्पष्ट होत असून ग्रुप २ मधून सेमीफायनलासाठी भारतीय संघाची मजबूत दावेदारी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ३ पैकी २ लढती जिंकल्या आहेत. अजून त्यांच्या २ लढती शिल्लक आहेत. ग्रुप २ मधून दोन संघ आहेत जे सेमीफायनलच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत.
जर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला तर त्याच्या समोर कोणाचे आव्हान असेल आणि अंतिम फेरीत पोहोचल्यावर कोणाचा सामना करावा लागले यासाठी समीकरण असे असेल.
वर्ल्डकमध्ये भारताने ३ सामने खेळले असून त्यापैकी २ मध्ये विजय तर एकमध्ये पराभव झालाय. गुणतक्त्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे ४ गुण आणि नेट रनरेट +०.८४४ इतके आहे. भारताला अजून बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध दोन मॅच खेळायच्या आहेत. या लढतीत टीम इंडिया मजबूत दिसते. अर्थात वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर देखील होऊ शकतो.
भारताने दोन मॅच जिंकल्या तर त्याचे ८ गुण होतील आणि ते ग्रुपमध्ये टॉपर होतील. जर द.आफ्रिकेने त्यांच्या दोन मॅच जिंकल्या तर त्यांचे ९ गुण होतील. अशा परिस्थितीत भारत गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिल. आफ्रिकेच्या अखेरच्या दोन लढती पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध आहेत.
सेमीफायनल लढती
वर्ल्डकपमध्ये पुढील काही सामन्यात काही धक्कादायक निकाल नोंदवला गेला नाही तर ग्रुप १ आणि २ चे चित्र स्पष्ट आहे. ग्रुप १ मधील आघाडीचा संघ ग्रुप २ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी तर ग्रुप २ मधील आघाडीचा संघ ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकाशी लढले. सध्याची स्थिती पाहता ग्रुप १ मधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचतील. ऑस्ट्रेलियाचे ५ गुण आहेत आणि त्यांची १ मॅच शिल्लक आहे. न्यूझीलंडचे देखील ५ गुण असून त्यांच्या दोन लढती शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत न्यूझीलंडला ९ तर ऑस्ट्रेलियाला ७ गुण मिळवता येईल. या ग्रुपमध्ये इंग्लंड देखील स्पर्धेत आहे. त्यांची एक मॅच न्यूझीलंडविरुद्ध आहे. इंग्लंडने दोन्ही मॅच खेळल्या तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेत बाहेर होऊ शकते. नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंड आणि इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचले.
ग्रुप २ मध्ये भारत अव्वल स्थानी राहिला तर सेमीफायनलमध्ये त्यांची लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. या उटल टीम इंडिया जर दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड किंवा इंग्लंडची लढावे लागले. वरील प्रमाणे लढती झाल्यास भारताला सेमीफायनलमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडविरुद्ध लढावे