पावसामुळे भारताचं वर्ल्ड कप स्वप्न भंगणार?
टी-२० विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारतीय संघ बुधवारी (२ नोव्हेंबर) बांगलादेशशी भिडणार आहे. उभय संघांमधील हा सामना ऐतिहासिक ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. गेल्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला किंवा पावसामुळे तो सामना रद्द झाला तर काय होईल, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल.
भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. प्रत्येकी एक गन मिळाल्याने पुन्हा दोन्ही संघ एकाच संख्यारेषेवर येतील. भारत-बांगलादेश सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल. म्हणजेच ४ सामन्यांत भारताचे ५ गुण असतील. भारताबरोबरच बांगलादेशचीही अशीच अवस्था असून पाऊस पडल्यास त्यांचेही ४ सामन्यांत ५ गुण होतील. त्यामुळे झिम्बावास विरुद्धचा सामना जिंकत भारताला उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे
जर भारतीय संघ बांगलादेशविरुद्धचा सामना हरला तर त्याच्या उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता कमी होऊ शकते. बांगलादेशविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारताचे कमाल सहा गुण होऊ शकतात. सहा गुणांपर्यंत पोहोचण्यासाठीही भारताला शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर मात करावी लागेल. बांगलादेशविरुद्धचा सामन्यात भारत पराभूत झाला तरी झिम्बाब्वेला हरवून भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, कारण भारताचा नेट-रनरेट बांगलादेशपेक्षा खूपच चांगला आहे.बांगलादेश जिंकला तर…..
जर टीम इंडिया बांगलादेशकडून पराभूत झाली, तर बांगलादेशने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यास दक्षिण आफ्रिकेसोबत बांगलादेश उपांत्य फेरी गाठू शकतो. पाकिस्तानशिवाय दक्षिण आफ्रिकेला कमकुवत नेदरलँड्सचा सामना करावा लागणार असून एक सामना जिंकल्यानंतर ते ७ गुणांवर पोहोचतील. तसे, पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे खूप कठीण आहे कारण ते जास्तीत जास्त सहा गुणांपर्यंत पोहोचू शकतात.
भारताच्या पराभवासाठी पाकिस्तान प्रार्थना करेल
भारतीय संघ बांगलादेशकडून हरला आणि पाकिस्तानी संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर त्यांच्यासाठी संधी मिळू शकते. अशा स्थितीत भारत-पाकिस्तानच्या दोन्ही संघांचे ४-४ गुण होतील. त्यानंतर ६ नोव्हेंबरला होणारे सामने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्या दिवशी भारताची झिम्बाब्वेशी, आफ्रिकेची नेदरलँडशी आणि पाकिस्तानची बांगलादेशशी गाठ पडेल. त्या दिवशी जर भारत आणि पाकिस्तान या दोघांनी आपापले सामने जिंकले, तर दोघांचे ६-६ गुण होतील आणि उत्तम नेट रन रेट असलेला संघ अंतिम चारमध्ये पोहोचेल.
तसे पाहता झिम्बाब्वेचा संघही उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत आहे. झिम्बाब्वेच्या संघाने नेदरलँड्स आणि भारताविरुद्धचे सामने जिंकले तर त्यांचे ७ गुण होऊ शकतात. केवळ नेदरलँड्स त्यांचे तीनही सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.
गट २ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)
२ नोव्हेंबर: झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड ॲडलेड, सकाळी ९:३० वा
२ नोव्हेंबर: भारत विरुद्ध बांगलादेश ॲडलेड, दुपारी १:३० वा
३ नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सिडनी, दुपारी १:३० वा
हेही वाचा: या २७ वर्षीय भारतीय गोलंदाजाचं संपणार होतं करिअर, तेवढ्यात मिळाली मोठी संधी!
६ नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स ॲडलेड, सकाळी ५:०३ वा
६ नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश ॲडलेड, सकाळी ९:३० वा
६ नोव्हेंबर: भारत विरुद्ध झिम्बाब्वे मेलबर्न, दुपारी १:३० वा