पिसाळलेल्या कुत्र्यासारखी कुणाची अवस्था, सदाभाऊ खोत यांनी कुणाला केलं लक्ष
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे आज नाशिक दौऱ्यावर होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यभर पक्षवाढीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे आज नाशिकमध्ये जाहीर केले आहे. याच वेळी उत्तर महाराष्ट्रापासून या दौऱ्याला सुरुवात केली जाणार असून पुण्यात या दौऱ्याची सांगता केली जाणार आहे. मात्र, याच काळात राज्यातील विरोधी पक्ष सत्ता हातातून गेल्याने एकदम पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागत आहे अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेला नाही, त्यांच्यावर फौजदारी स्वरपाची कारवाई तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. राज्यातील विरोधी पक्षाची परिस्थिती पाहता एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता सुरू आहे असल्याचे मतही खोत यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय कायद्याचे राज्य असतांना खंजीर खुपसण्याच्या गोष्टी केल्या जात असेल तर याला राज्यातील विरोधी पक्ष जबाबदार असल्याचचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दौरा आखला आहे.
हा दौरा नाशिकपासून सुरू करण्यात आला असून पुण्यात त्यांची सांगता केली जाणार आहे, याशिवाय सत्तेसोबत असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा सरकारला दिला आहे.
याशिवाय महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाहेर गेल्याने त्यांची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाल्याची टीका खोत यांनी केली आहे.
याशिवाय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. राहुल गांधी मोठे नेते असून घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत सत्कार करण्याची प्रथा आहे.
पण साठ वर्ष काँग्रेस सत्तेत होते, मात्र काय सुधारणा झाल्या, याचं अवलोकन करावे लागेल, त्यांनी भारत जोडो यात्रा ऐवजी पाप मुक्ती यात्रा काढायला हवी होती