कंदलगावात स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाचा छापा

(crime news) कंदलगाव (ता. करवीर) येथील वंडरला लॉजिंग अँड रेस्टॉरंटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. तर एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. कारवाईत 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

महेश अमृत जाधव (वय 30, रा. नेर्ली, ता. करवीर) व अमोल तानाजी माने (38, शहाजी वसाहत, शिवाजीपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ रोडवर कंदलगाव हद्दीत वंडर लॉजिंग अँड रेस्टॉरंटमध्ये काही काळापासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. (crime news)

गरीब, गरजू महिलांना लॉजिंगवर बोलावून तेथे त्यांना शरीरविक्रयास प्रवृत्त करण्यात येत होते. महेश जाधव व अमोल माने स्वत: वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाली. पोलिस निरीक्षक संजय गोर्ले व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले यांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

संशयित महेश जाधव व अमोल माने या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेश्या व्यवसायासाठी लॉजवर बोलाविण्यात आलेल्या पीडित महिलेची पथकाच्या वतीने सुटका करण्यात आली. पथकात फौजदार राजेंद्र घारगे, रवींद्र गायकवाड, किशोर सूर्यवंशी, मंनाक्षी पाटील, तृप्ती सोरटे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *