जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रचाराच्या धडाडणार्या तोफा उद्या थंडावणार
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या धडाडणार्या तोफा शुक्रवारी (दि. 16) बंद होणार आहेत. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी दोन दिवस मिळणार असल्याने उमेदवार व समर्थकांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. (election)
सोशल मीडियाचाही वापर
जिल्ह्यातील 474 ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. गेला आठवडाभर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. न पोहोचलेल्या मतदारापर्यंत जाण्याचा उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विरोधकांच्या हालचालींवर पाळत
सायंकाळच्या सत्रात तरुण कार्यकर्ते, उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारासाठी मैदानात उतरतात. रात्री दहा वाजेपर्यंत ते प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्री दहानंतर विरोधकांच्या हालचालींवर पाळत ठेवणे सुरू केले आहे. सरपंचपद खुले आहे त्या गावांमध्ये प्रचंड टोकाची ईर्ष्या पहावयास मिळते. शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड याचा वापर करण्यात येत आहे. (election)
प्रचारात महिलांची आघाडी
प्रचारात प्रत्येक गावातील महिलांनी मोठी आघाडी घेतली आहे. दररोज सकाळापासून ते सायंकाळपर्यंत महिला घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. पंधरा ते वीस महिला एकत्र येत उमेदवाराची माहिती लोकांना सांगतात.