कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील ‘ईडी’समोर हजर

(political news) मनी लाँडरिंगच्या आरोपावरून चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची मागील वर्षभरापासून सीबीआय व ‘ईडी’कडून वारंवार चौकशी केली जात आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स फसवणूक प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत १०८ जणांनी तक्रारी केल्या आहेत. आता साखर कारखान्यातील या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील ‘ईडी’समोर हजर झाले आहेत. ईडीने त्यांना फेब्रुवारी महिन्यात समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. आता त्यांची चौकशी केली जात असल्याचे ईडीने म्हटले आहे.

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. ते आज मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर झाले होते. पण त्यांची आज चौकशी झाली नाही. त्यांना नव्याने समन्स बजावून चौकशीसाठी बोलण्यात येणार आहे.

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या व भागीदार असलेल्या व्यक्तींच्या घरावर गेल्या सोमवारी सकाळी पुण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. यात सॅलिसबरी पार्क, गणेश पेठ, नवी पेठ, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण नऊ ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली होती. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. (political news)

कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते म्हणून ओळखले जाणारे मुश्रीफ यांचे कोणत्या व्यावसायिकांशी कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत व त्याविषयीची काही कागदपत्रे हाती लागतात काय, याची तपासणी करण्यासाठी ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *