रेपो रेटबाबत RBI ची मोठी घोषणा, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी US फेड बँक सतत आपले व्याजदर वाढवत आहे. नुकतंच त्यांनी पुन्हा एकदा व्याजदरात (interest) वाढ केली आहे. RBI ने मोठा दिलासा दिला आहे, RBI ने रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ केली नाही. रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. मात्र हा रेपो रेट ३ महिन्यांसाठीच असेल. पुढे वाढणार की नाही याबाबत सध्या कोणतेही संकेत दिले नाही.

आज जागतिक बाजारातून देशांतर्गत बाजारासाठी संमिश्र संकेत दिसत आहेत. नॅस्डॅक निर्देशांकात 1% पेक्षा जास्त कमजोरी आल्यानंतर, IT शेअर्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.आरबीआयच्या एमपीसी बैठकीच्या पार्श्वभूमीवर, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावरही आज लक्ष असणार आहे.

जगभरात आर्थिक मंदीचं संकट आहे. आधीच अमेरिका आणि युरोपमधील बँकांची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत US फेड रिझर्व्ह बँकेनं आपल्या व्याजदरात (interest) वाढ केली आहे. त्याचा परिणाम जगभरात दिसून आला. आता RBIने देखील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

RBI ने आतापर्यंत सहावेळा रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांचे EMI देखील वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जातून दिलासा मिळाला नाहीच असं म्हणायला हवं. आता EMI आणि कर्जासाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *