टाकळी इंग्लिश स्कूल मध्ये मातृ-पितृ पूजन उत्साहात संपन्न
नामदेव निर्मळे
_________
(local news) सैनिक टाकळी .तालुका:- शिरोळ. जिल्हा:- कोल्हापूर. येथील टाकळी इंग्लिश मीडियम स्कूल सैनिक टाकळी शाळेमध्ये मातृ-पितृ पूजन व विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी शाळेच्या पटांगणावर भव्य मंडप व सजावट करण्यात आले होती.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या आई वडिलांचे पाद्यपूजन व औक्षण केले. आजच्या धावपळीच्या जीवनात असे संस्कार मोलाचे अनुभव व मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना मिळाले. कार्यक्रमांचे अध्यक्ष केंद्र शाळा मुख्याध्यापक श्री प्रकाश नरोटे सर होते .प्रमुख पाहुणे ऍड. एन. जे. पाटील. रिटायर हवालदार. जनार्दन पाटील. प्रगतशील शेतकरी. अजित पाटील. उपस्थित होते.
ऍड. एन. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष मनोगत श्री नरोटे सर यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले आजची मुले ही आपले अनुकरण करत असतात. आपली मुले जर यशस्वी व्हायचे असतील. अज्ञानदाराक हवी असतील. तर आपण पालकांनी आपल्या मुलांचे आवडते बनले पाहिजे .तर आपले मुले आज्ञाधारक बनतील यशस्वीपणे घडतील.
यावेळी राष्ट्रीय स्तरावरील सामान्य ज्ञान स्पर्धा गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय लेव्हलच्या कराटे स्पर्धा व झालेल्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मेडल व प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक श्री विजयकुमार गवंडी सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला .व भविष्यामध्ये शाळेची वाटचाल व पुढील वर्षीपासून स्कूलमध्ये लीड इंटरनॅशनल एज्युकेशन ची सुरुवात होणार आहे. याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्कूलच्या मुख्याध्यापिका .सो. स्वप्नाली पाटील मॅडम. यांनी केले. (local news)
या कार्यक्रमांमध्ये पालक श्री. सुनील पाटील .स्वराज्य अकॅडमी चे. श्री विनोद पाटील यांनी पालकांच्या वतीने शाळेच्या कार्याचे कौतुक व आभार व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम .आर. पाटील. सर यांनी केले. यावेळी सैनिक टाकळीचे लोकनियुक्त सरपंच. सो.हर्षदा पाटील .ग्रामपंचायत सदस्य. सुदर्शन भोसले .श्री .संतोष गायकवाड उपस्थित होते. तसेच पालक आजी-माजी सैनिकी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी स्कूलच्या सर्व शिक्षिका शिक्षक व कर्मचारी वर्ग जीवनविद्या मिशन सैनिक टाकळी चे सर्व नामधारक व पालकांनी कष्ट घेऊन कार्यक्रम शोभा वाढवली .व कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला.