विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुरुंदवाड येथे सलग तीन वर्षे कार्यक्रम करून ‘वंचित’ने साधली हॅटट्रिक
कुरुंदवाड/ प्रतिनिधी:
(local news) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कुरुंदवाड येथे जिलेबी आणि मठ्ठा वाटप करण्यात आले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रारंभी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना जिलेबी वाटून तोंड गोड करण्यात आले. तसेच थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आले. कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. विजय घाटगे यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी त्यांची पी. एस. आय. पदी निवड झाल्याबद्दल वंचितच्या वतीने ॲड. ममतेश आवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष महिपती बाबर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष व कुरुंदवाड अर्बन बँकेचे संचालक आण्णासाहेब पाटील. डॉ. एस. के. माने, महेश कांबळे, मातंग समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष शाहीर आवळे, मातंग समाज संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप बिरणगे आदी उपस्थित होते. (local news)
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी केले तर आभार ॲड. ममतेश आवळे यांनी मानले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय सुतार, तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, कुरुंदवाड शहराध्यक्ष दीपक कडाळे. संजय माळगे, तालुका उपाध्यक्ष विनायक पार्थनाहल्ली, सचिव संदीप कांबळे, जुबेर मोमीन आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गणेशवाडी येथील वंचित बहुजन आघाडी शाखेचे पदाधिकारी तसेच कुरुंदवाड , बस्तवाड, अकिवाट व हेरवाड शाखेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कुरुंदवाड शहराध्यक्ष दीपक कडाळे, जुबेर मोमीन, संजय सुतार यांचे सहकार्य लाभले.
🙏🙏
संजय सुतार
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी