दूध दरावर कपातीचे विरजण; शेतकरी दुहेरी कात्रीत
जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी (farmer) दुहेरी कात्रीत सध्या सापडले आहेत. सर्व संघांनी गाय दूध दरात मोठी कपात केली आहे. तर दुसरीकडे पेंड, मका, भरडा, सरकी, विविध प्रकारची चुनी, शेंगपेंड, मका आटा आणि सर्व कंपन्यांच्या गोळी पेंड दरात मोठी वाढ झाली आहे.
दुष्काळी भागात पाऊसच नसल्याने ओल्या चार्याची समस्या वाढली आहे. वाळलेला चाराही संपला आहे. दुसरीकडे गाय दूध दरात 2 रुपये तर खासगी कंपन्याकडून तब्बल 6 रुपये कपात केली आहे. जोपर्यंत दर वाढत नाहीत तोपर्यंत शेतकरी (farmer) कात्रीत सापडले आहेत.
शेंगदाणे भाव वाढल्याने दर्जेदार पेंड महाग
सध्या मार्केटमध्ये शेंगदाणे दरात मोठी वाढ झाली आहे. बोल्ड गुजरात शेंगदाण्याचा दर 11 रुपये, घुंगरू शेंगदाणे दर 9 रुपये तर लोकल शेंगदाणे दरात प्रतिकिलोस 7 ते 9 रुपये वाढ झाली आहे. शेंगदाणे पेंडचे दरही वाढले आहेत. तसेच दर्जेदार शेंगदाणे पेंडला 60 रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे पूर्वी 2700 रुपये असणारी पेंड आता 2900 ते 3100 रुपये झाली आहे.
पावडरचा उठाव घटल्याने उतरले दर
गाय दूध खरेदी दर महिन्यापूर्वी सरासरी 37 रुपये होता. पावडर तयार करणार्या प्लांटमधून पावडरचा उठाव कमी झाल्याने काही कालावधीत हे दर लगेच 37 वरून 31 रुपयांवर आणले आहेत. सहकारी दूध संघांनीही 35 रुपयावर नेलेले दर पुन्हा 2 रुपयाने कपात करून 35 वर आणले आहेत.