बारावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी

बारावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या (job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये भरती सुरु असून यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. अ‍ॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाच्या आस्थापनेवर ही भरती केली जाणार आहे. येथे लो मेडिकल ऑफिसरची 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्रता

निम्न वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच त्याच्याकडे सरकारमान्य संस्थेचे ‘कुष्ठरोग तंत्रज्ञ’ प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे.

उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा वा तत्सम परीक्षा किंवा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराने संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे शासन मान्य संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

‘निम्न वैद्यकीय कार्यकर्ता ‘या पदावर निवडलेल्या उमेदवारांकडून २०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर करारनामा ( प्रतिज्ञापत्र) घेण्यात येईल.

कंत्राटी कालावधीत काम करण्या-या उमेद्वारांची सेवा महापालिकेच्या नियमित तत्वावरिल सेवेसाठी, सेवाजष्ठतेसाठी विचारात घेतली जाणार नाही किंवा सेवेचा सेवाजेष्ठतेसाठी प्राधान्य देण्यात येणार नाही, तसेच भविष्यात त्यांना ‘निम्न वैद्यकीय कार्यकर्ता ‘ पदावर हक्क सांगता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ही रिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरावयाची असल्याने उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.

निवड झालेल्या उमेदवारांसाठी निवास स्थानांची व्यवस्था केली जाणार नाही. सदर पदांची निवड यादी पदासाठी आवश्यक गुण म्हणजेच उच्च माध्यमिक (10+2) शालांत परिक्षा आधारे बनविण्यात येणार आहे. (job)

वयोमर्यादा

किमान वय १८ वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष असेलेल उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

पगार

अ‍ॅक्वर्थ रुग्णालयाच्या आस्थापनेवरील ‘निम्न वैद्यकीय कार्यकर्ता पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18 हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

लो मेडिकल ऑफिसर पदाची भरती ही कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. 6 महिन्याच्या कालावधीसाठी हे पद भरले जाईल, याची उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी नोंद घ्या.

कुठे पाठवाल अर्ज?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज वैद्यकिय अधिक्षक, अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय, मेजर परमेशवरन मार्ग, वडाळा (प) मुंबई ४०००३१ येथे पाठवावेत.

उमेदवारांनी आपले अर्ज 14 जुलै 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाठवावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *