आल्याची साल फेकून देऊ नका, सालीपासून बनवा हे डिटॉक्स वॉटर
आल्यामध्ये (ginger) भरपूर प्रमाणात आरोग्यदायी गुणधर्म असल्याने आलं शरीरासाठी पोषक आहे. चहामध्ये रोज आलं टाकण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र काही लोक आल्याची सालं कचरा समजून फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर आजच थांबा. आल्याच्या सालापासून डिटॉक्स वॉटर तुम्ही बनवू शकता.
डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने तुमच्या पोटातील आणि शरीरातील सर्व टॉक्झिक पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे या पाण्याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते, चला तर मग जाणून घेऊया आल्याच्या सालीपासून डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे ते.
त्यासाठी लागणारे साहित्य
आल्याची साल १ टेस्पून
चहाची पाने १/४ टीस्पून
पाणी 2 कप
लिंबाचा रस 1 टीस्पून
चहाची पाने १/४ टीस्पून
पाणी 2 कप
लिंबाचा रस 1 टीस्पून
आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे?
आल्याच्या (ginger) सालीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.
नंतर त्यात पाणी टाका आणि थोडा वेळ उकळायला ठेवा.
यानंतर, तुम्ही त्यात चहाची पाने टाका आणि सुमारे 2 मिनिटे गरम करा.
नंतर त्यात आल्याची साले टाकून ती चांगली उकळावी.
यानंतर गॅस बंद करा आणि गाळणीच्या मदतीने पाणी गाळून घ्या.
आता तुमचे आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर तयार आहे.
नंतर एका कपमध्ये गाळून घ्या आणि थोडा लिंबाचा रस टाकून प्या. (Health)
आल्याची सालीचे पाणी पिण्याचे फायदे
आल्याच्या सालीचे पाणी पिल्याने तुमचा मेटाबोलिझम पावर वाढतो. सोबतच तुमची चयापचनाची शक्तीही वाढते. आणि वजन कमी होण्यासही मदत होते. रोज सकाळी या पद्धतीने हे पाणी पिऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल.