Google Pay युझर्ससाठी गुडन्यूज!
UPI Lite हे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिझाइन केलेली ही डिजिटल पेमेंट (Digital Payments) सर्व्हिस आहे.
यामध्ये यूझर्स त्यांच्या UPI Lite अकाउंट सिंगल टॅपने 200 रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकतात. या सर्व्हिसमध्ये ट्रांझेक्शनसाठी पिन टाकण्याची गरज नाही. UPI Lite चे उद्दिष्ट डिजिटल पेमेंट (Digital Payments) सोपी आणि जलद करणे आहे.
UPI Lite यूझर्सच्या बँक अकाउंटशी लिंक्ड असते. परंतु, ते रिअल टाइममध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून नाही. UPI Lite द्वारे पीक ट्रान्झॅक्शन टाइममध्येही हायर सक्सेस रेट मिळतो.
यूझर्स या सर्व्हिसमध्ये दिवसातून दोनदा 2,000 रुपये लोड करू शकतात आणि एकावेळी 200 रुपये देऊ शकतात. Paytm आणि PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हे फिचर आधीच जारी केले आहे.
सध्या 15 बँका UPI Lite ला सपोर्ट करतात. Google Pay मध्ये UPI Lite अॅक्टिव्ह करण्यासाठी, तुम्हाला अॅप उघडावे लागेल. त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यातून प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
नंतर खाली स्क्रोल करा आणि UPI Lite फिचर शोधा. नंतर त्यावर टॅप करावे लागेल, ज्यामुळे इंस्ट्रक्शन आणि डिटेल्ससह एक नवीन स्क्रीन दिसेल. यानंतर तुम्हाला activate UPI Lite वर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट लिंक करावे लागेल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.