आता ट्विटरवरूनही कमावता येणार पैसे; असं करा अप्लाय

यूट्यूब ज्याप्रमाणे आपल्या कंटेंट क्रिएटर्सना पैसे देतं, त्याच प्रमाणे आता ट्विटर देखील आपल्या यूजर्सना (user) पैसे देऊ लागलं आहे. एका यूजरला या माध्यमातून पहिलंच पेमेंट तब्बल ५ लाख रुपये मिळालं आहे. तुम्हालाही अशा प्रकारे ट्विटरच्या माध्यमातून कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

व्हेरिफाईड यूजर्सना सुविधा

ट्विटरच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आधी तुम्हाला ट्विटरला पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच, तुमच्या अकाउंटला ब्लू-टिक असणं बंधनकारक आहे. ट्विटरच्या फ्री यूजर्सना सध्या अ‍ॅड्स रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्राम ही सुविधा मिळणार नाही.

इतरही अटी

या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी इतरही अटी आहेत. या सुविधेसाठी पात्र व्हायचं असेल, तर तुमच्या ट्विटर अकाउंटवर तीन महिने सातत्याने ५ मिलियन पेक्षा अधिक ट्विट इम्प्रेशन असणं गरजेचं आहे. सोबतच, तुमच्या अकाउंटवर ५०० अ‍ॅक्टिव्ह फॉलोवर्स असणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त एक पुनरावलोकन प्रक्रिया देखील पार पाडावी लागणार आहे.

यूजरला (user) सबस्क्रिप्शन नियमांचे पालन करावे लागेल. तसेच, यूजरचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. यूजरचा ईमेल आयडीही व्हेरिफाईड हवा, आणि २FA देखील ऑन असणं गरजेचं आहे. यूजरने भूतकाळात ट्विटर यूजर अ‍ॅग्रीमेंटचे उल्लंघन केलेलं नसावं, अशा अटींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला अ‍ॅड्स रेव्हेन्यू शेअरिंग सुविधा मिळणार आहे.

असं करा अप्लाय

यासाठी तुम्हाला ट्विटरच्या सेटिंग्समध्ये जाऊन, मॉनिटायझेशन हा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये अ‍ॅड्स रिव्हेन्यू प्रोग्रामसाठी अप्लाय करण्याचा पर्याय दिलेला आहे. सध्या केवळ ठराविक यूजर्ससाठी हा प्रोग्राम उपलब्ध करून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या माध्यमातून ट्विटर काही क्रिएटर्सना १,००० ते ४०,००० डॉलर्स एवढी रक्कम देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *