यशस्वी जैस्वालची रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी! पहिल्याच शतकासह रचला इतिहास

(sports news) वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्याच डोमिनिका इथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या पहिल्या वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडिजच्या खेळाडूंना आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी विंडिजला पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर विंडिजकडून एलिक एथानझे याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली.

त्यानंतर टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी 151 धावा करत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. या दरम्यान यशस्वी आणि रोहित या दोघांनी अर्धशतकं पूर्ण केली. त्यानंतर या दोघांनी द्विशतकी सलामी भागीदारी केली. यासह या जोडीने आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली. या दोघांनी इतिहास रचला.

टीम इंडियाकडून यशस्वी आणि रोहित या सलामी जोडीने विंडिज विरुद्ध विक्रमी भागीदारी रचली. या दोघांनी द्विशतकी सलामी भागीदारी करत हा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहित आणि यशस्वीची विक्रमी द्विशतकी भागीदारी

रोहित आणि यशस्वी या दोघांनी 413 बॉलमध्ये ही द्वशतकी भागीदारी केली. या भागीदारीत रोहितने 85 आणि यशस्वीने 9 धावांचं योगदान दिलं. तसेच यानंतर यशस्वी आणि रोहित या दोघांनी आपली वैयक्तिक शतकंही पूर्ण केली. (sports news)

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *