बाळाचा बाप कोण? इलियाना डिक्रूझ ने अखेर केला खुलासा
(entertenment news) बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही प्रेग्नंट असून त्याविषयी सोशल मीडियावर सांगताना दिसते. इलियानानं त्याकाळाती होणारा त्रास आणि त्याला एक आशीर्वाद म्हटलं होतं. इलियानानं एप्रिल महिन्यात तिच्या प्रेग्नंसी विषयी सांगितलं होतं. जेव्हा पासून इलियानानं तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं आहे, तेव्हापासून सगळ्यांना तिच्या प्रेग्नंसी बाळाचं वडील कोण आहे हे जाणून घ्यायचं होतं. आता इलियानानं तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. बऱ्याच काळापासून इलियानानं हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं की तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण आहे.
इलियानानं लग्न केलं नसताना ती प्रेग्नंट आहे. अशात तिचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि तो काय करतो याविषयी सगळीकडे चर्चा सुरु होती. सगळ्यांना तिच्या बॉयफ्रेंडविषयी जाणून घ्यायचं होतं. अशात इलियानानं नुकतंच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. इलियानानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत इलियानानं डेट नाइट असं कॅप्शन दिलं असून रेड हार्ट इमोटीकॉन वापरलं आहे. या फोटोत इलियानानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिच्या बॉयफ्रेंडनं काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं आहे. पण इलियानानं हे फोटो शेअर करत तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलेलं नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मात्र, इतका आनंद झाला नाही. पण इलियानानं कमीत कमी तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवला आहे. फोटोत दोघेही कोझी झाल्याचे पाहायला मिळत आहे. (entertenment news)
इलियानानं काही दिवसांपूर्वीच तिच्या अंगठीचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोला पाहून अनेकांना वाटलं ती तिचा साखरपुडा झाला आहे. पण तिनं याविषयी कोणतीही बातमी दिलेली नाही.