कोल्हापूरकी सुपुत्री फ्रान्स के बडी कंपनीकी सीईओ
‘आपकी हिंदी अच्छी है… आप भारत से है…’ अशी विचारणा (prime minister) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये ‘फ्रेंच लक्झरी हाऊस’ कंपनीच्या सीईओ लीना नायर यांना केली. तेव्हा नायर यांनी ‘हाँ मैं भारतीय हूँ और महाराष्ट्र के कोल्हापूरसे हूँ’ असे सांगताच ‘भारत की सुपुत्री फ्रान्स के बडी कंपनीकी सीईओ… ए देख के अच्छा लगा…’ अशी प्रतिक्रिया मोदी यांनी देत नायर यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातच झाले आहे.
(prime minister) पंतप्रधान मोदी हे फ्रान्स दौर्यावर असताना तेथे स्थानिक उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी मोजक्या लोकांना संधी देण्यात आली. त्यात लीना नायर यांचा समावेश होता. मोदी यांनी नायर सीईओ म्हणून काम करत असलेल्या कंपनीची माहिती घेतली. यानंतर भारतातील हस्तकलेला फ्रान्समध्ये प्रोत्साहन देणे शक्य असल्याचे सांगितले. जगप्रसिद्ध अशा कंपनीत भारतीय महिला सीईओ म्हणून काम करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मोदी यांनी नायर यांच्याशी संवाद साधताना सांगितले. तसेच ‘लक्झरी हाऊस’च्या माध्यमातून भारतातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मोदी यांनी सांगितले. भारतातील हस्तकारागीर तसेच खादीला फ्रान्सची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन नायर यांनी दिले.
दरम्यान, या भेटीने आपण भारावून गेल्याचे लीना नायर यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे व्हीजन तसेच महिलांना उद्योग क्षेत्रात पाठबळ देण्यासाठी ग्रामीण भागातील हस्तकला व खादीवरील कलाकुसर याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राबवत असलेल्या विविध योजनांचे कौतुक केले.
नायर या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. येथील होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी दहावी, तर न्यू कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. जमशेदपूर येथून ‘एमबीए’ची पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर 1992 मध्ये त्या हिंदुस्थान लिव्हर कंपनीत शिकाऊ व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्या. जगभरातील विविध कंपन्यांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.