भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच?

(sports news) एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत बुधवारी 19 जुलै रोजी महामुकाबला रंगणार आहे. पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यात हायव्होल्टेज मॅच होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. यश धूल याच्याकडे टीम इंडिया ए चं कर्णधारपद आहे. तर सॅम अयुब हा पाकिस्तानची धुरा सांभाळणार आहे.

टीम इंडिया हॅटट्रिक पूर्ण करणार?

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत यूएई आणि त्यानंतर नेपाळचा धुव्वा उडवला आहे. यश धुलच्या नेतृत्वात टीम इंडियाने शुक्रवारी 14 जुलै रोजी यूनायटेड अरब अमिराती टीमचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. तर त्यानंतर 17 जुलैला टीम इंडियाने नेपाळचा 9 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडिया प्रतिष्ठेच्या साम्नयात पाकिस्तानचा बाजार उठवणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमेनसामने असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना पर्वणीच असणार आहे.

पाकिस्तानही सज्ज

दरम्यान दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननेही सलग 2 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 14 जुलैला नेपाळवर 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने यूएईवर 184 धावांची विजय मिळवला. अशा प्रकारे पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी नेपाळ आणि यूएई या दोन्ही संघांचा पराभव केलाय.

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए आमनेसामने

पाकिस्तान क्रिकेट टीम

सॅम अयुब (कॅप्टन), मोहम्मद हारिस (विकेटकीपर), साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कामरान गुलाम, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, शाहनवाज दहनी, मेहरान मुमताज, हसीबुल्ला खान, मुबासिर खान आणि अमद खान बट. (sports news)

टीम इंडिया

यश धुल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी, आरएस हंगरगेकर, आकाश सिंग, युवराजसिंह डोडिया, प्रभसिमरन सिंग आणि प्रदोष पॉल.

भारत-अ विरुद्ध पाकिस्तान-अ यांच्यात बुधवारी (19 जुलै) कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना पाहता येणार आहे. फॅनकोड अॅपवर देखील मॅच पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *