असा मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, Jio अ‍ॅपवर असं करा अप्लाय!

तुम्हाला Reliance Jio चा व्हीआयपी नंबर हवा असेल तर तुम्ही तो अगदी सहज मिळवू शकता. तुमचा आवडता नंबर (mobile number) मिळवण्यासाठी तुम्हाला Jio.com वर दिलेली सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल.

तुम्ही Jio पोर्टलवर VIP कॅटेगिरीमध्ये तुमच्या आवडीचा नंबर घेऊ शकता. यासाठी पहिले www.jio.com पोर्टलला भेट द्या किंवा www.jio.com/selfcare/choice-number/ या लिंकवर जा.

येथे ‘Book a Choice Number’ च्या खालील बॉक्समध्ये तुमचा सध्याचा मोबाइल नंबर एंटर करा. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक OTP मिळेल, तो टाकून लॉगइन करा.

पुढील प्रोसेसमध्ये, तुम्ही तुमचा प्रिफ्रेंस नंबर टाकून एंटर करु शकता. पुढे गेल्यावर, तुम्हाला काही नंबर (mobile number) सजेशन दिसतील. येथे तुम्हाला आवडलेला नंबर त्याच्या शेजारच्या बॉक्सवर क्लिक करून घेऊ शकता.

नंबर सिलेक्ट केल्यानंतर या प्रोसेसमध्ये काही मिनिटे लागू शकतात. यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाते. यामध्ये 499 रुपये भरल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *