पावसाची बॅटिंग; टीम इंडियाला फटका
(sports news) वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने व्हिलनची भूमिका बजावली. दुसऱ्या सामन्यातील पाचव्या आणि अंतिम दिवशी पाऊस झाला. त्यामुळे एकही ओव्हरचा गेम होऊ शकला नाही. त्यामुळे परिणामी सामना अनिर्णित राहिला. यामुळए टीम इंडियाची वेस्ट इंडिजला 2-0 ने व्हॉईटवॉश देण्याची संधी हुकली. तर पावसाने वेस्ट इंडिजची लाज राखली. टीम इंडियाने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाचा हा सलग नववा कसोटी मालिका विजय ठरला. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात विंडिजवर एका डावाने आणि 141 धावांनी विजय मिळवला होता.
पावसाची बॅटिंग मॅच ड्रॉ
टीम इंडियाने पहिल्या डावात विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर 483 धावा केल्या. प्रत्युत्तरात विंडिजचा पहिला डाव हा मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर 255 धावांवर आटोपला. सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 183 धावांची आघाडी मिळाली. दुसरा डाव टीम इंडियाने 181 धावांवर घोषित केला. त्यामुळे विंडिजला विजयासाठी 365 रन्सचं टार्गेट मिळालं.
विंडिजने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे पाचव्या दिवशी विजयासाठी 289 धावांची आवश्यकता होती. मात्र पावसानेच पाचव्या दिवशी बॅटिंग केली. पाऊस थांबता थांबत नव्हता. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला.
टीम इंडियाला फटका
टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी पावसाने हिरावून घेतली. तसेच सामना ड्रॉ राहिल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 मध्ये 12 गुणांचं नुकसान झालं. विजयी संघाला 12 पॉइंट्स मिळतात. मॅच टाय झाल्यास 6 आणि ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघाना प्रत्येकी 4-4 पॉइंट्स मिळतात. टीम इंडियाने हा सामना जिंकला असता, तर टीम इंडियाचे आधीचे आणि आताचे असे एकूण 24 पॉइंट्स झाले असते. मात्र पावसामुळे ते होऊ शकलं नाही. (sports news)
विंडिज विरुद्ध सलग नववा कसोटी मालिका विजय
दरम्यान टीम इंडियाला दुसरा कसोटी सामना जिंकता आला नाही. मात्र टीम इंडियाने विंडिजवर सलग नववा मालिका विजय साकारला आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 फेरीतील सुरुवात ही शानदार केली.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.