भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिज संघामध्ये धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री

(sports news) भारत-वेस्ट इंडिजमध्ये टेस्ट सीरीजची Action संपली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सोमवारी 24 जुलैला दुसऱ्या टेस्टच्या अखेरच्या दिवशी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एका चेंडूचाही खेळ होऊ शकला नाही. मॅच ड्रॉ झाली. टीम इंडियाने कॅरेबियाई भूमीवर आणखी एक टेस्ट सीरीज जिंकली. टेस्ट नंतर आता लवकरच वनडे सीरीज सुरु होणार आहे. यासाठी विडिंज बोर्डाने टीमची घोषणा केली आहे. एका धडाकेबाज फलंदाजाचा पुन्हा टीममध्ये समावेश झाला आहे.

टेस्ट सीरीज संपल्यानंतर भारत-वेस्टइंडिजमध्ये आता तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. 27 जुलैपासून ब्रिजटाउन येथे पहिला वनडे सामना होणार आहे.

वेस्ट इंडिजला नवीन सुरुवातीची संधी

आगामी वनडे वर्ल्ड कपचा विचार करता टीम इंडियासाठी ही सीरीज महत्वाची आहे. पण तेच वेस्ट इंडिजला वनडे क्रिकेटमध्ये एक नवीन सुरुवात करता येईल. कारण वेस्ट इंडिजची टीम वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही.

होपवर होप कायम

या सीरीजसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय स्क्वाडची घोषणा केली आहे. पोर्ट ऑफ स्पेन टेस्ट संपल्यानंतर काहीवेळात विंडीज बोर्डाच्या सिलेक्शन कमिटीने वनडे टीम निवडीची घोषणा केली. विंडीज टीमची कमान शेई होपच्या हातात आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करु शकली नाही. पण तरीही होपवर विश्वास कायम आहे.

2 वर्षानंतर हेटमायरच पुनरागमन

विंडिज बोर्डाच्या सिलेक्टर्सनी एक मोठा निर्णय घेतला आहे. डावखुरा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायरला टीममध्ये स्थान दिलं आहे. हेटमायरला वर्ल्ड कप क्वालिफायरसाठी निवडलं नव्हतं. त्यावरुन बरीच टीका झाली होती. हेटमायरला 2 वर्षानंतर ODI आणि एक वर्षानंतर कुठल्याही फॉर्मेटमध्ये निवडलं आहे. (sports news)

भारताविरोधात दमदार रेकॉर्ड

26 वर्षाच्या हेटमायरचा भारताविरोधात दमदार रेकॉर्ड आहे. त्याने 12 वनडे सामन्यात 500 धावा केल्या आहेत. यात 2 सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी आहे. त्याची 45 ची सरासरी आणि 121 चा स्ट्राइक रेट आहे. हेटमायरशिवाय वेगवान गोलंदाज ओशेन थॉमसची टीममध्ये निवड झालीय.

दोन मोठे प्लेयर बाहेर

विंडिज टीमला झटका सुद्धा बसला आहे. स्टार ऑलराऊंडर जेसन होल्डर आणि विस्फोटक विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरन या सीरीजमध्ये खेळणार नाहीत. दोघे सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हते. टेस्टमध्ये डेब्यु करणाऱ्या एलिक एथनेजचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

वेस्टइंडीजचा स्क्वाड

शेई होप (कॅप्टन), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर, ओशेन थॉमस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *