प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंहच्या आईकडे खंडणीची मागणी, नेमकं प्रकरण काय?
(sports news) टीम इंडियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंह याची आई शबनन सिंह यांच्याकडे 40 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती. युवराज सिंह याच्या आईला खोट्या प्रकरणात अडकवण्याची भिती दाखवण्यात आली. हे सगळं टाळण्यासाठी खंडणीची मागणी करण्यात आली. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणात एका युवतीला अटक केली आहे. युवतीने सर्वप्रथम शबनम सिंह यांच्याकडे 40 लाख रुपये खंडणी मागितली.
मंगळवारी 5 लाख रुपये एडव्हान्स घेताना पोलिसांनी या मुलीला अटक केली. युवराज सिंहची आई गुरुग्रामच्या डीएलएफ फेस वनमध्ये राहते. त्यांनी डीएलएफ फेस वन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
देखभालीसाठी हायरिंग
2022 मध्ये युवराज सिंहचा छोटा भाऊ जोरावर सिंहच्या देखभालीसाठी हेमा कौशिक ऊर्फ डिंपी नावाच्या केअरटेकरला नोकरीला ठेवलं होतं. जोरावर मागच्या 10 वर्षांपासून नैराश्याचा सामना करतोय. म्हणूनच त्याच्या देखभालीसाठी हायरिंग केली होती, असं शबनम सिंह यांनी सांगितलं.
हेमाला नोकरीवरुन का काढलं?
“नोकरीला ठेवल्यानंतर 20 दिवसातच माझ्या लक्षात आलं की, हेमा प्रोफेशनल नाहीय. उलट ती जोरावरला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे मी हेमा कौशिकला नोकरीवरुन काढलं” असं शबनम यांनी सांगितलं.
सतत व्हॉट्स App मेसेज, फोन
DLF फेज 1 पोलीस स्टेशनमध्ये दाखल FIR नुसार, मे 2023 मध्ये हेमा कौशिक शबनम यांना सतत व्हॉट्स App मेसेज, फोन करत होती. हेमाने युवराजच्या आईला धमकी दिली. पैसे मिळाले नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. हेमाने शबनम सिंह यांच्याकडे 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. (sports news)
कशी झाली अटक
शबनम सिंह यांना 19 जुलैला एक मेसेज आला. हेमा कौशिकने या मेसेजेमध्ये धमकावले होते. पैसे दिले नाहीत, तर 23 जुलैला एफआयआर दाखल करण्याची तिने धमकी दिली होती. त्यानंतर शबनम यांनी इतक्या साऱ्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी हेमाकडे वेळ मागितला. हेमाला 5 लाख रुपये एडव्हान्स द्यायच ठरलं. मंगळवारी ती पैसे घेण्यासाठी येणार होती. मंगळवारी हेमा जेव्हा शबनम सिंह यांच्याकडे एडव्हान्स पैसे घेण्यासाठी आली. त्यावेळी पोलिसांनी तिला अटक केली. शबनम सिंह यांच्या तक्रारीच्या आधारावर हेमा विरोधात जबरदस्ती पैसे उकळण्याचा आयपीसी 384 अंतर्गंत गुन्हा दाखल झालाय.